Blog

VIDEO-खल्लारग्रामस्थांनी उधळली यु.स्वा.पक्षाची सभा

नवनित राणांना गावबंदी केली असताना जबरदस्तीने सभा घेण्याचा प्रयत्न

खबरदार प्रतिनिधी

खल्लार,(दि.17)- युवा स्वाभिमानचे रवी राणा व त्यांच्या पत्नी नवनित राणा यांना गावबंदी केलेली असताना युवा स्वाभिमानच्या उमेदवार रमेश बुंदिले याच्या प्रचाराकरिता जबरदस्तीने सभा घेतल्याने खल्लार ग्रामस्थांनी त्यांची सभा उधळून लावत, नवनित राणा व त्यांच्या कार्यकर्त्यांना गावाबाहेर हाकलून लावले.    खासदार असताना जनतेचा भ्रमनिरास केल्याने लोकसभेमध्ये निवडणूकीदरम्यान अंजनगाव तालुक्यातील चौसाळा येथून गावक:यांनी प्रचार करायला गावात आलेल्या नवनित राणा यांना हाकलून लावले होते. अंजनगाव तालुक्यातील अनेक गावात त्यांना गावबंदी असताना त्यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांची जाहीर सभा ग्राम खल्लार येथे आयोजित केली. या सभेला गावक:यांचा आधीपासूनच विरोध होता. असे असताना शनिवारी (दि.16) ला नवनित राणा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावात जबरदस्तीने सभा घेण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे. याप्रकारामूळे संतापलेल्या गावक:यांनी सभा उधळून खुर्च्यांची तोडफोड केली व नवनित राणा यांना गावातून हाकलून लावले.

हिंदू-मुस्लिम रुप देण्याचा प्रयत्न
काही लोकांनी व्हिडीओ काढून ही सभा मुस्लिम लोकांनी उधळून लावली असे रुप देवून ऐन निवडणूकीच्या काळात हिंदू-मुस्लिम वादाचे रुप या घटनेला देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुस्लिम समाजाने ही सभा उधळून लावली, ही अफवा असून कुणीही यावर विश्वास न ठेवता, शांतता राखण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षकांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!