अमरावतीच्या हृदयस्थळी कसे चालायचे सेक्स रॅकेट?
रिव्हाईव्ह स्पा सेंटर बनले होते आंबट शौकीनांचा अड्डा
खबरदार प्रतिनिधी
अमरावती,(दि.12)-अंबानगरीचे हृदयस्थळ म्हणून ओळख असलेल्या राजकमल चौकात एका स्पा सेंटरच्या नावाखाली चालत असलेल्या एका सेक्स रॅकेटचा रविवारी(दि.11) भंडाफोड झाला. माजी उपमहापौर शे.जफर यांनी हा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली. असे सांगितल्या जाते. परंतू कोतवाली पोलिसांना खरचं या सेक्स रॅकेटचा थागपत्ता नव्हता, हे ऐकतांना थोडं अपचन होत आहे.
रिव्हाईव्ह नावाने असलेल्या या स्पा सेंटरमध्ये लहान-लहान खोल्या आढळून आल्या, ज्या पार्टीशन टाकून बनविण्यात आल्या. 4 तरुणी येथे होत्या ज्यामधील दोन तरुणीचे आधार कार्डही तेथे सापडले, ज्या मुली पुणे आणि उत्तरप्रदेश येथील असल्याचे समजत होते. माजी नगरसेवक लविना हर्षे यांनी या सगळ्या प्रकाराची माहिती घेतली. तर नागरिकांनी संचालकांना चांगले चोपले.
तिघांवर कारवाई
याप्रकरणी संचालक मोहित भोजवाणी (इंदौर), नारायण तरडेजा (अंबिका नगर) व गौतम सेवानी यांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये मिश्रा नामक एक आरोपी फरार असल्याची माहिती आहे, परंतू पोलिसांकडे अशी कुठलीच माहिती नव्हती. याप्रकरणी तीन मुलींनाही ताब्यात घेण्यात आले होते.