Amravati

VIDEO: अचलपूरात रस्त्यावरुन वाहले रक्ताचे पाट

खबरदार प्रतिनिधी
अचलपूर,(17)- आकाशातून पावसाची संततधार आणि रस्त्यावर वाहणारे रक्ताचे पाट हे दृष्य गुरुवारी दुपारी अचलपूरात पहायला मिळाले. ही वेळ होती मोहर्रम पर्वावर होणा-या अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आत्म-ध्वजारोपण किंवा ‘मातम’ ची. लहानग्यांपासून ते मोठे प्रत्येकजण काळी सलवार नेसूण उघड्या अंगावर तिक्ष्ण अश्या लोखंडी चाबकाने स्वत:ला फोडून काढत होते. तोंडातून ‘या हुसैन’ असा घोष करत बेधुंद होत हा मातम केल्या जात होता. ‘मातम’ मध्ये सामील असलेल्यांच्या शरिरातून निघणा-या रक्ताच्या धारा पाहणा-यांचे काळीज पिळवून टाकणारा हा प्रसंग असतो.

मोहरम या शब्दाचा एक अर्थ पवित्र असा आहे. मुस्लिम ज्या व्यक्तींना परमपवित्र मानतात ( प्रेषित महमद, त्यांची मुलगी फातिमा, जावई अली, आणि हसन व हुसेन हे दोन नातू) , त्यातील शेवटच्या दोन व्यक्तींच्या, म्हणजे हसन व हुसेन यांच्या दुःखद हत्येबद्दल शोक, आत्म-ध्वजारोपण किंवा ‘मातम’ करण्याचा हा दिवस आहे. प्रेषित महमद यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जावई अली व त्यानंतर त्यांचा नातू हसन हे खलिफा झाले.
माहिती आहे की, हसन खलिफा असताना मुआविया नावाचा एक सरदार सिरीयाचा सुभेदार म्हणून काम पाहत होता. तो वारल्यानंतर त्याचा मुलगा याजीद हा त्या प्रांताचा सुभेदार झाला. त्याने शिया इमाम हुसैन इब्न अली यांचा खून करविला. आपला भाऊ हसन याच्या मृत्यूमुळे हुसेन याला फार दु;ख झाले. याजीद्च्या विरुद्ध जाऊन काही लोकांनी हुसेनला मदत करण्याचे आश्वासन दिले. व त्याला हसनच्या खुनाचा सूड उगविण्याची चिथावणी दिली. हुसेनने सैन्याची जमवाजमव करून याजीद्च्या विरुद्ध करबला या ठिकाणी युद्ध केले. परंतु या युद्धात हुसेन व त्याचे सर्व कुटूंबिय मारले गेले. याच घटनेच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस पाळला जातो. हा सण फक्त शिया पंथीय लोक साजरा करतात. सुन्नी पंथीयांचा या सणाला विरोध आहे.
या दिवशी ताबुताची मिरवणूक काढली जाते. पवित्र हुतात्म्यांच्या प्रतिमा, पवित्र तख्ताची प्रतिमा, प्रेषित मोहमद ज्या घोडयावरून (बुराख) जेरुसलेमला व तेथून स्वर्गात गेले त्या पंखधारी घोडयाची प्रतिमा, प्रेषित महमदाची काल्पनिक तलवार, राजसत्तेच्या निशाणाच्या प्रतिमा इत्यादी अनेक प्रतिमा किवा तागुत एखाद्या खास इमारतीत (आशूरखान्यात) ठेवतात. व त्यांची मिरवणूक काढली जाते. मोहरमच्या नवव्या व दहाव्या दिवशी बरेच मुस्लिम उपवास करतात. मोहरमच्या दहाव्या दिवसाला अशुरा असे म्हणतात. या दिवशी काही लोक गोडधोड करून गरिबांना वाटतात.

अचलपूरात जुनी परंपरा
मातम ला घेवून दोन विचार प्रवाह आहेत. अनेक मुस्लिम याला नैतीक विरोध करतात. अचलपूरात मोहर्रमच्या दहाव्या दिवशी मातम करण्याची परंपरा जुनी आहे. या पर्वावर संवेदनशील असलेल्या या शहरातील शांतता सुव्यवस्था राखण्याकरिता जिल्ह्याभरातील पोलीसांसह एसआरपीएफच्या ठिकठिकाणी तैनात करण्यात येतात.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!